कोरोनाची तिसरी लाट
कोरोनाची तिसरी लाट
कासावीस झाला जीव बिचारा
सुचेनासे झाले सारे
संपत नाही दुसरी लाट आता
तिसरी येऊन उभी झाले
शक्ती ना राहिली आता
घरात दडून बसण्याची
सोयही नाही लागेलं रे एक वेळच खाण्याची
ज्ञानी गुणी लोक आता सारे घरी बसलेले
सुचेना त्यांनाही काही
काय सारे हे मांडलेले
कोरोनाची ही दुसरी लाट कायमची संपू दे
तिसरी लाट मात्र आता आहे तिथेच विरू दे
