एकटेपणा
एकटेपणा
डोळे बंद केल्यावरती, काळोख जसा गर्द दिसे
सोबत जेव्हा कोणी नसे, काळोखाची गर्दी असे
त्या काळातला प्रवास तेव्हा असे फार जीव घेणा
विचारांनी भरलेल्या डोक्याला आधार कुणाचा मिळेना
एकटेपणा नकोच मुळी , जीवनात या जगताना
सोबत असावं कुणी , आपण ऐकट असताना
