आपला निर्णय
आपला निर्णय
लहान होती मी तेव्हा, वाटायचे व्हावे डॉक्टर
छानून काढावेत शरीरातले, एकूण एक सेकटर
थोडे झाले मोठी, वाटल व्हाव पोलिस
नियम तोंडणाऱ्या प्रतेकाला, पर्सनल द्यावी नोटिस
निर्णयांची जेव्हा माझ्या, धांदल उडाली मनात
झालोत मोठ आपण आता, विचार आला क्षणात
हे करू की ते करू, मला मात्र सुचत न्हवत
दिवसेन दिवस माझ, वय मात्र वाढत होत
वेळ आली निर्णयाची तेव्हा, डॉक्टर पोलिस दिल सोडून
भलत्याच क्षेत्राशी मग माझ, नात गेल जोडून
वाटल आता आपले निर्णय, आपणच घ्यायला हवेत
असं क्षेत्र निवडू की, यश येईल कवेत
केला ठाम निर्णय, बघितल नाही मागे पुढे काही
आता जग म्हणत या क्षेत्रात काहीच स्कोप नाही
सगड सोडून मग म्हटल काही तरी करू
घेतलाच आहे निर्णय तर जिंकू कीवा हरू
मनात आला विचार की एवढ्यात हार का मानवी
स्कोप नाही म्हणून काय जिद्द आपली सोडावी
शेवटचा का होईना एक ठाम निर्णय घ्यावा
आपण घेतलेल्या निर्णयाला एक चान्स द्यावा.
समिक्षा संतोष वाकोडे
