नातीगोती
नातीगोती
1 min
497
भूतकाळ वेगळा
वर्तमानात मी आहे
भविष्यात काय होणार
चाहूल लागून आहे
ओळखीची दुनिया जरी
अनोळखी का वाटते
कुणी आपले कुणी परके
उत्तर नेहमी हेच मिळते
सर्व एकच समान आहे
पण भावना मनाची ती
आपले परके करता करता
जीवन संपून जाते
आपापली जोडून नाती
मग सांगून फुगवून छाती
सर्वच आपली नातीगोती
बांधल्या आहेत एकच गाठी
