जीवनाचा प्रवाह
जीवनाचा प्रवाह
जीवनाच्या प्रवाहात मी
नाते पाहिलं खूप असे,
नावापुरती नाती फक्त
आपुलकी मात्र कुठेच नसे,
आपुलकीच्या ओलाव्याला,
राहून मग घाम फुटे
जीवन हे एकदाच आहे
कुणी आपले कुणी परके
शोधण्याला काय अर्थ आहे,
सर्वच आपले करायला
धाडस लागते भले मोठे
आपले परके करणाऱ्याला
ओळखत नाही कोणी कुठे
जुडवा नाती सर्वांशी
मग जगण्याला अर्थ असे
होतील जेव्हा सर्वच आपले
आपुलकीचा वारा सुटे
