कोरोनाचा कहर
कोरोनाचा कहर
सकाळपासून चा संयम, असा कसा सुटला,
का करतो ? काय करतो ? हेच काही कळेना,
इतकी बंधने लावली, तरी यांना काही कळेना.
गांभीर्य राहिले बाजूला, अन मेंढरांचा बाजार भरला,
बट्याबोळ, लाखाचे बlरा हजार,
एक ना धड, भराभर चिंध्या,
हा अर्थ नव्याने कळला.
हसावे की रडावे हेच कळेना आता, की
भीक नको पण कुत्रे आवर, अशी ही तऱ्हा
बापड्यानो, आता तरी जागे व्हा रे जरा.!
समजून उमजून, धीराने वागा जरा,
जगलो, वाचलोच तर करू ना सेलिब्रेट पुन्हा
प्रेतांचा खच आणि हा:हा:कार होईल जेव्हा,
अग्नी द्यायलाही कोणीच नसेल तेव्हा !
समजून घ्या इशारा, अन सावधानता पाळl,
जिथे कुठे आहात, तिथेच सुरक्षित राहा !
हात जोडून परमेश्वरा, विनविते रे तुला
आतातरी सद्बुद्धी दे रे हया पामरांना
आज हेच पसायदान दे आम्हाला
मानवजातीवरचे संकट टळू दे रे पुन्हा !
