कोरोना...
कोरोना...
1 min
45
घरात जीवन बाहेर मरण
सांगा तुम्हाला हवे काय?
संकट मोठं जगावर साऱ्या
कोरोनाने पसरले पाय
हिंमत मोठी त्या मर्दांची
रस्त्यावर ती फिरणाऱ्यांची,
पर्वा जीवाची नसणाऱ्यांची
करा रवानगी सीमेवर त्यांची
प्रशासन त्रस्त किती हे सारं
पडला दुनियेला जीवाचा घोर,
घर सोडून हे रस्त्यावर
अजून कित्येक आहेत बहादुर
घर सुरक्षित असताना
सर्व डोळ्याला दिसताना,
बाहेर तुम्हाला फिरताना
सोडेल का रे कोरोना...