STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Inspirational Others

3  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

कोरोना

कोरोना

1 min
244

कोरोनाने पाहता पाहता 

स्वतःचे जाळे विणले, 

एक एक भक्ष पकडता 

सगळ्यांना शिकवत गेले. 


मानवाने घालवली माणुसकी 

प्रेम, शांती, माया विसरला, 

पैशामागे धावता-धावता 

आपलेपणाच सोडून दिला. 


शिकवण्यास धडा आज 

निसर्गानेही कहर केला, 

भर पडली त्यातही 

माणूस माणसावर पेटला. 


किती भयानक दृश्य हे 

एका विषाणूने जीवन बदलले, 

जैविक युद्ध म्हणावे याला

का कर्माचे फळ मिळाले?  


वाईट जरी काळ असला 

शहाणपण सर्वांना मिळाले, 

भविष्य वाचवण्यास सारे 

आज समजून वागू लागले. 


वेळ कितीही वाईट असली 

संयमाने वागणे नेहमी बरे, 

स्वच्छ तनाबरोबर मन ही 

निर्मळ ठेवणे हेच खरे. 


करुया नमन निसर्गास 

प्रण आज घेऊन सारे 

हरवण्यास या कोरोनाला 

मोडू या संक्रमणाची साखळी रे! 


बांधू या स्वतःला शिस्तीत 

करू या पालन मनाने, 

वाचवू एकमेकांचा जीव 

जपू या माणुसकी प्रेमाने.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational