कोरोना
कोरोना
कोरोना वायरसचं
भय आहे सर्वांना
स्पर्श न होई कुणा
महामारी रोगराईंना...
आज आहे जनता कर्फ्यू
सर्वानी मिळून पाळू या,
सरकारच्या धोरणाला
हातभार लावू या...
स्वच्छता घरादाराची,
होळी करेल रोगराईची,
दूर पळवू कोरोना लागण,
हीच आमची खबरदारी...
भोजनात केलेला बदल,
साधे वरण भात पोळी करु,
मांसाहारी भोजन वर्ज्य करु,
शुद्ध शाकाहारी करु...
टाळ्यांचा गडगडाट सुरु करु,
चोहीकडे घंटानाद देऊ,
विषाणुला टाळी उर्जेने दूर करु,
कास सकारात्मकतेची धरु...