STORYMIRROR

Angulimaal Urade

Tragedy Others

3  

Angulimaal Urade

Tragedy Others

कोरोना वायरस

कोरोना वायरस

1 min
11.8K

कोरोना वायरस नावाच्या विषाणूने

जन्म घेतला म्हणे चायना देशात

जन्माला येताच हुकूमत गाजवली

कोरोना व्हायरस ने संपूर्ण जगात


साधा सर्दी-खोकला झाला तरी

लोक बोलू लागले झालाय का ! कोरोना

कोरोना व्हायरस हे नाव ऐकताच

आम जनतेला काहीच सुचेना


कोरोना ने हादरवून सोडलं वुहान शहर

त्याच्या थरकापाने जग झालय लाचार

चायनाने कुठून आणला कोरोना आजार

कोरोनाच्या भितीने जनता झाली बेजार


कोरोनाच्या वेड्या वाकड्या न्यूज दाखवतात

पण कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी

कोणी देत नाही योग्य ती आयडिया

कोरोनाबद्दल घाबरवत आहे लोकांना

ही माथेफिरु नावाची मिडीया


कोरोना व्हायरसच्या नावाने

सारं जग लागलं आहे झुरू

कोरोनाच्या भीतीच्या थरकापाने

मार्शल जनता लागली आहे मरू


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy