STORYMIRROR

Angulimaal Urade

Others

3  

Angulimaal Urade

Others

कर्मयोगी

कर्मयोगी

1 min
248

नित्य नेमाने जनता करी

त्या पंढरीची जत्रा वारकरी

गाडगेबाबा मात्र नियमित

चंद्रभागेचा तो किनारा झाडून काढी.....!


कर्मयोगी गाडगेबाबा यांनी केले

अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम महान

अमरावती विद्यापीठाला देऊनी नाव

ठेवला गेला डेबूजींचा मान सन्मान........!


गाव ग्राम स्वच्छतेचा मूलमंत्र देऊन

झाडून काढत ते सारा गाव

अनाथांचे पितामह बनुनी

गाडगे बाबा झाले जगी महान......!


अनिष्ठ रुढी परंपरेवर करुनी मात

कीर्तना मधून केला समाज परिवर्तन

कर्मयोगी संत श्रेष्ठ गाडगेबाबास

"मार्शल" माझे विनम्र अभिवादन


Rate this content
Log in