भाकर
भाकर
1 min
293
डोक्यावरती घेऊनी कर्जाचे डोंगर
शेतीमध्ये फिरवितो रे तो नांगर
जीवनात खाऊनी अनेक ठोकर
तरीही सार्या देशास भरवितो रे भाकर
अंगावरती नेसावया असे फाटकेच धोतर
शेतात पीक पिकवितो रे मि कसुनी कंबर
पण देशातील शासनकर्त्या सकारला
"मार्शल" नाही रे या शेतकऱ्यांची कदर
शेतकरी दिवसभर उन्हात राबराब राबून
त्च्याया अंगाला फुटला रे घामाचा पाझर
जीवन जगण्याची हृदयी ठेवूनीया जिगर
कमवितो आहे रे दोन घासाची तो भाकर
