STORYMIRROR

Angulimaal Urade

Tragedy

3  

Angulimaal Urade

Tragedy

समाधान

समाधान

1 min
12K

आज वेळच तशी आली सर्वांवर

म्हणून गरजू जनता घेत आहे

तुमच्याकडून दोन-चार किलोचे राशन


गरिबांना अन्नदान म्हणून देतो तू

देताना मात्र चार लोकांना घेऊन

सेल्फी काढून करू लागला तू फॅशन


आपण ज्या गोरगरिबांना करतो दान

तीच गोरगरीब जनता करायला हवी

चार चौघात उठता-बसता तुझे भूषण


मी याला दिलं, त्याला दिलं अनाज

असं गल्लीत अन् चौका चौकात

तू स्वतः ठोकू लागला आहे भाषण


ज्या गरजू गरीबांना दान करतो

त्यांची फोटो काढून करू नको टिंगल

मार्शल सरळ हाताने कर तू दान

तेव्हा कुठे गरिबाला मिळेल समाधान !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy