कोरोना लाटेस आमंत्रण
कोरोना लाटेस आमंत्रण
उठले लॉकडाऊन
भरला आज बाजार,
किती दिवसांचा बंद
हळूहळू उलगडणार...१
बंद दुकाने उघडली
मॉल ही सुरू झाले,
फेरीवाल्यांच्या फेऱ्या सुरू
हॉटेल्स ही जगमगले...२
कित्येक दुःखी कष्टी मने
आनंदी आज झाले,
जरी सुरळीत सारे जीवन
तरी भान विसरून गेले...३
स्वैरपणे वावरणे
पडेल आज महागात,
कोरोना लाटेस आमंत्रण
देतील सगळेच नकळत...४
जरी मिळाली परवानगी
समंजसपणे वागावे,
पायमल्ली तुडवून नियम
आयुष्य वेशीवर ना टांगावे...५
