STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Tragedy Others

3  

Nurjahan Shaikh

Tragedy Others

कोरोना बळी

कोरोना बळी

1 min
203

ऊसतोडकरीचा मुलगा 

कष्टाने डॉक्टर झाला, 

कर्ज काढून शिकला

मात्र कोरोनाने त्याला गाठला!! 


आज भासे अडचण त्याला

म्हणे, कसे फेडू, वाकलो कर्जाने, 

पूर्ण झाले स्वप्न डॉक्टरीचे 

लढू कसे आज कोरोनाने ?


खर्च डोंगराएवढे वाढले 

झाले आईबापही मोकळे, 

द्यायचा आहे आधार त्यांना 

पण संपून गेले घडित सगळे!!


देवा एकच मागणे 

धाड कोणास तरी रे, 

हाक माझी ऐक 

का घेतोस परीक्षा माझी रे?


हवाय मला सहवास 

माय बापाचा मी खास,

मी च नाही राहिलो तर 

कोण चारेल यांना घास?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy