कोणी होती अशी
कोणी होती अशी
कोणी होती अशी
जी माझी वाटायची
गोड आठवणींसारखी
माझ्या मनात साठायची || 0 ||
तिच्याच रंगात मी कधी
रंगलो होतो
तिच्याच स्वप्नात कधी मी
दंगलो होतो
ती गेली आणि
संपलो मी
तिच्याच विरहात मी
भंगलो होतो
कधी चुकलो तर
हक्काने मला दाटायची
गोड आठवणींसारखी
माझ्या मनात साठायची || 1 ||
ती माझ्या हृदयाची
भाषा होती
ती माझ्या मनाची
अभिलाषा होती
काहीच नकॊ
होतं मला
तीच माझी एकमेव
आशा होती
प्रेमात उत्तुंग
माझ्यासवे शिखर गाठायची
गोड आठवणींसारखी
माझ्या मनात साठायची || 2 ||