कोण आपला?
कोण आपला?
.पादाकुलक- मात्रावृत्त
एकूण मात्रा :- १६
(८+८)
संसार मस्त जरी वाटला ।
सुख दुःखाने जीव त्रासला ।।
शुभ्र चंद्रमा नभी पाहता।
तुझा चेहरा दिसू लागला।।
विसंबून मी असा राहिलो।
तुझ्या बटांनी गळा कापला।।
स्वार्था पायी उजाड राने
कुऱ्हाड दांडा काळ जाहला।।
अरे *पंडिता*, जरा शोध घे
जगात आहे कोण आपला?।।