कोलाज
कोलाज
मौनातले भाव
एकांतातले मन आणि
तो ढगाआड लपलेला सूर्य
नेतोय कुठंतरी लांबवर
डोळ्यात साठवलेल्या
त्या मौनातल्या भावनांच
काय करावं समजत नाहीये
परंतु .....
कधीकाळी आपणच आपल्या
त्या क्षणांचे कोलाज आपण त्या
ढगाआड लपवले होते न्
तेच क्षण आता अवतीभवती
रेंगाळत राहतायत
आपणच आखलेल्या मनाच्या कुंपणात
आपणच पुन्हा पुन्हा अडकत जातो आहोत
भावनांचा कोंडमारा होतोय
मौनातले भाव आणि एकांतातले मन
पुन्हा पुन्हा तेच क्षण वेचीत
उरातल्या "त्या " काळजातल्या
कोलाज डोळे बंद करून अनुभवतेय
पुन्हा पुन्हा ......
