कन्या कोळ्याची
कन्या कोळ्याची
1 min
199
पाचूच्या बनी , हिरवी झाडे
सुसाट वारा , मस्तीत डुले
उंचच उंच , नारळी बने
कन्या कोळ्याची , लाटांशी खेळे
आली वयात , यौवन खुले
गोड हास्य , अवखळ साजे
पोवळ्याची माळ , लई खुले
माय म्हणे हिला , उजवा गडे
सपानचा सखा , सत्यामधे
माणकांची माळ , प्रेमे घाले
डोळे भरती , लगीनवेळे
माय रडे , नीट रहा बाळे
रीत आगळी , जगाची कशी
नवरीबाई , वळूनी पाही
सुखाचा स्वर्ग , पती संगती
सुखी रहा , घरकुलामधी