कमळाचे रोपटे
कमळाचे रोपटे
अचानक सर्व घडले...
काही न मला कळले...
तो अचानकच आला....
घराच्या मागच्या परिसरात होते चिखल .....
आणि त्या चिखलात काही तरी टाकून गेला...
काय टाकले म्हणून मी....
तेथे बघाया गेले.....
पण मला ना तिथे काही दिसले...
तसेच परतून मी माघारी आले.....
पण डोक्यात प्रश्नांनानी घर केले....
काय टाकून गेला असेल तिथे बरे....???
काही वेळाने मी पुन्हा तेथे गेले....
तरी पण मला तेथे काही न दिसले....
मग मी त्याचे विचार सोडून दिले....
आणि आपल्या रोजच्या प्रवासात गुंतले....
काही महिने असेच उलटून गेले....
पावसाळी पावसाला सुरूवात झाले...
आज अचानक मी त्या दिशेला गेले...
मला तेथे छोटेसे वर आलेले अंकुर दिसले....
जवळून मी त्याला न्याहरले....
ते कसले रोपटे ते न मला कळले.....
काही दिवसांनी ते रोपटे झाले मोठे...
म्हणून पुन्हा परतून मी गेले थेट तेथेच..
बघता क्षणी मला ते कळले....
की त्या पक्षाने तेथे कमळाचे बी पेरले.....
म्हणून आज त्याचे त्या चिखलात ....
कमळाचे मोठे रोपटे झाले.....
