कल्पनारम्य
कल्पनारम्य
सरतेशेवटी होणार आहे
तुमच्या आयुष्याची माती
प्रेमाने अन् आपुलकीने
जपावी आपली नाती
शरीराला जपा उत्तम
सहवास आंनदी मिळवा
निरोगी अन्न खावून
आयुष्याचे चाक पळवा
नको वाद नको तंटा
का वाढवता डोक्याला ताप
शांत मनाने वागावे
नको अविचाराचा शाप
करा विचार चुकांचा
थांबवा अघटीत गोष्टी
योगदान कणभर तुमचे
वाचवेल सारी सृष्टी
कल्पनारम्य आयुष्यात
अस्तित्व जागवा तुमचे
सत्याची धरुनी कास
स्वत्व जपावे तुमचे