लाडकी लेक
लाडकी लेक
आईबाबांच्या पंखाखाली सदा उब मिळते प्रेमाची
लाडकी लेक गिरवते शिकवणी संस्कारांची
तोलामोलाची शिकवण सांभाळून ती वापरते
थोरामोठ्यांच्या शब्दांना वेळोवेळी ती जपते
नाही ढळू देत तोल सदा करते सन्मान
विचारांचा करे आदर देत सार्यांना ती मान
सासरवाशिण होताना जवाबदारी ती पेलते
विश्वासाने नवे नाते खांद्यावर ती तोलते
लेक लहान असो वा मोठी आईबाबांना ती लाडकी
लावते लिंपण नात्याला भिंत असो कितीही पडकी
कळू देत नाही कुणाला वेदना तिच्या मनातली
सोशिकतेची ओढून शाल उब जपते नात्यातली