रंग पांढरा
रंग पांढरा
निळ्या आकाशी ढग पांढरे
आल्हाद स्वच्छ अन् निर्मळ
विहार करिती पक्षी बिनघोर
अंगी यावा साधेपणा सरळ
चांदणे शुभ्र पांढरे
चमचमे काळोखात
संघर्ष टाळून जीवनी
सेवाभाव हवा पानात
मांगल्याचे प्रतीक
पावित्र्याची किनार
शुभ्र रंग उभारे
साधेपणाने मिनार
ठेवा शुद्ध आचरण
जपा विनम्र भाव
शांततेने चालवावी
जीवनाची नाव