नववधू
नववधू
नवलाईच्या नऊ दिवसांचे
वाटते नववधूला कौतुक
नवा नवा तामझाम अन्
नसतं काहीच अगंतुक
सन वार सोहळ्यांचे
अप्रूप घडते घरात
सडा रांगोळीचे सत्र
दिसू लागते दारात
पाहुण्यांची उठा ठेव
मोठ्या उत्साहाने घडते
नववधूचे मन मात्र
आतल्या आत रडते
नवी जागा नवी लोक
बावरलेलं सारं जग
जोडीदारासंगे होतो सुरू
संसाराचा नवा वग
नवलाई सरू लागते
प्रपंचाला होते सुरुवात
राजाराणी गडून जाती
नवकल्पनांच्या राज्यात