चांगले विरुद्ध वाईट
चांगले विरुद्ध वाईट
धावण्याची आस होती
पाय होते बांधलेले
सांगण्याचा ध्यास होता
तोंड होते सांधलेले
आवडीचे काम होते
लोक होते गांजलेले
नावडीचे खेळ होते
त्यात अश्रू सांडलेले
वेदनांचे नाव होते
बोल होते बोललेले
भावनांचे गाव होते
राव होते चाललेले