STORYMIRROR

गोविंद ठोंबरे

Abstract

4  

गोविंद ठोंबरे

Abstract

अंतरीचे भाव

अंतरीचे भाव

1 min
473

थेंब-पाणी, ऊन-वारा सोसला मी

काळजावर घाव माझ्या झेलला मी...


भेद सारा माणसाचा माणसाला 

भाव भेदी माणसाचा सोडला मी...


दूर जाता काठ ओले पापणीचे

अंजनाचा गंध ओला चोरला मी...


आग आहे काळजाला वेदनेची

अंतरीचा प्राण आता जाळला मी...


प्रेमवेडे भाष सारे मांडताना

काळजाला हात आता घातला मी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract