साजन
साजन
वृत्त - मनोरमा
गाल गागा गाल गागा
चांदण्याची रास झाला
धुंद वारा खास झाला
साजनांची भेट होता
देह हा मधुमास झाला
पामरांची वाट होता
तारणारा श्वास झाला
काळजाला स्पर्श होता
जीवनाचा भास झाला
वाढणारा मित्र होता
अमृताचा घास झाला
जीवनाची सांज होता
चांदण्यांचा ध्यास झाला
आयुष्याचा पाठ होता
वर्तुळाचा व्यास झाला