जमलंच तर
जमलंच तर
सांजेचे क्षणभंगुर रंग नको
पहाटेची प्रसन्नता दे..
जमलं तर ठीक नाहीतर
तिमिराची विपन्नता दे..!!
न पेक्षा दुपारचं रणरणतं ऊन हो
काही हरकत नाही..
निदान जळून तरी जातील
साऱ्या आशा आकांक्षा
बाकी दुसरं काही नाही..!!
जमलंच तर चिरनिद्रा हो
पण स्वप्न तर मुळीच नको..
पहिली तितकी पुरेशी आहेत
आता जगणे मृगजळी नको..!!
