तो पाऊस
तो पाऊस
ढग दाटून आलीत आणि
काळीज आलं काळवंडून
विजेने घेतला मेंदूचा ताबा
भावना बसल्या गळ्यात दडून
वर्तली गेली दाट शक्यता
पाऊसधारा येण्याची
भिजल्या ओथंबल्या पापण्या
गाथा मुक्या मुक्त कंठाची
आठवणींचं गाठोडं
मानगुटीवर बसलं
अवस्थतेच्या हुंदक्याला
पोटाच्या कळेनी जोपासलं
