STORYMIRROR

Sharad Kawathekar

Abstract Tragedy

4  

Sharad Kawathekar

Abstract Tragedy

प्रवास

प्रवास

1 min
318

विवंचनेच गाठोडे घेऊन 

रानावाटेतून जुन्या नव्या 

पायावाटांना तुडवत तुडवत

आसपासच्या मौनात असलेल्या झाडांशी

एकटाच बडबडत निघालोय

डोक्यात हिशोबांच्या आकड्याशी

खेळत खेळत इथंवर आलोय

जगण्याचे संदर्भ या तिथल्याच

चिमण्याच्या चिवचिवाटात शोधतोय

पापण्यातल्या अश्रूचा भार सोसत

आणि सोसलेल्या त्या मरणप्राय

यातनाची अवशेष काळजात कोबून पुढं पुढं चाललोय

भोवतालच्या द-या, ती किर्र जंगल आणि असंच बरंच काहीबाहीच्या

या सा-या भुगोलाच्या पसा-यात

ते लपवलेले जखमांचे व्रणही

त्या विवंचेनेच्या गाठोठ्यांपेक्षाही

वजनदार वाटू लागलेत आताशा

या सा-यात पुन्हा एकदा 

त्या अस्ताव्यस्त वर्तमानाच्या क्षितिजावर तो विखुरलेला तो पुर्वेचा सूर्य उगावला

आणि मी पुन्हा त्या रानवाटेशी पायवाटेशी

पुन्हा त्या मौनातल्या झाडाशी

संवाद करत करत मुक्कामाच्या ठिकाण गाठण्यासाठी पुढं जात राहिलो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract