कल्पना
कल्पना
तुझी कल्पना करने, हवेहवेसे वाटायचे.
एकटा हसलो की माझ्याच धुंदीत आहे, साऱ्यांना समजायचे.
अस्पष्ट धूसर असा, एक चेहरा दिसायचा.
मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी, हलका आनंद असायचा.
रेखीव आखीव अशी सुंदरता, मनाला जाणवायची.
परीस्तीथी अनोळखी चित्र सुद्धा, आपल भासवायची.
कधीतरी स्वप्नातून, सत्यात उतरशील.
जोडीने सोबत माझ्या, चार दोन पावले चालशील.
हसत हसत मनमोकळ्या, गप्पा मारशील.
मी एकटक पहिलं की, गालातल्या गालात लाजशील.
माझा प्रत्येक शब्द, गांभीर्याने ऐकशील.
तुझीही सुखदुःख, सोबत माझ्या सांगशील.
दुरावा जवळ येताच, डोळे माझ्या सोबत पाणावतील.
उद्याच्या भेटीची तळमळ, चाहूल तेच पाहतील.
भ्रमनीरास झाला तरी, काहीतरी गोष्टीत समांतर वाटशील.
सत्याचा स्पर्श होताच, माझ्या कल्पना तुला कळतील.

