कळी रूसली
कळी रूसली
कळी रुसली
गाली फुगली
कळी रुसली
नाक लाल करून बसली
कळी रुसली
काही बोला काही विचारा तोऱ्यात आली
कळी रुसली
तोंड फिरवत नाक उडवत एका जागी हलेना कसली
कळी रुसली
कान पकडता हात जोडता नाही रागवणार म्हणता
मग हसू लागली
कळी रुसली
