STORYMIRROR

Sulabha Gogarkar

Children

3  

Sulabha Gogarkar

Children

थांबा बाबा थांबा

थांबा बाबा थांबा

1 min
253

थांबा बाबा थांबा जरा, नका करू घाई,

राग मग आला की, बोललं जातं काही,

तुमच्या इतक्या कष्टाची, खरचं गरज नाही,

विज्ञानाची जोड आम्हा, पूर्वी सारखे नाही ।।१।।


तुमची दिनचर्या, शिक्षण, अन् गरीबी ती ही,

सांभाळलत् जीवापाड, कष्टाला तोड नाही,

दुस-यांसाठी जगलात, ठाऊक सर्व काही,

आदर्शच तुम्ही माझे, तरीही खटकतं काही ।।२।।


रोजच्या रोज, सकाळी उठण्यासाठी,चिडणं,

नोकरी, शिक्षण, संस्कारावर नको ते बोलणं,

आशा, अपेक्षा तुमच्या सांभाळल्या तरी,

वरून म्हणता,आमचं वागणं पटतच नाही ।।३।।


नँरोपँट, बेलबाँटम्, गाँगल अन् हिप्पी.

तुमच्याही काळात, होतीच ती जादुची झप्पी,

सायकल, बाईक गेली हाती कार आता आली,

रेडीओ, टेपरेकाँर्डर ची जागा मोबाईल, नेटनी घेतली ।।४।।


उशिरा उठतो, उशिरा झोपतो, म्हणून मी आळशी ?

शिक्षण घेऊन नोकरी नाही, ह्यात मी दोषी ?

लग्न जुळत नाही, पैसा नाही, हयाची मला शिक्षा ?

हयाच काळी सोबत हवी तुमची, अन् हवी ती दिक्षा. ।।५।।


तंत्राचा अती वापर, सुखलोलुप कधी-कधी,

काळजी, दुःख आमचे, आम्हालाही शब्द नाही,

घरी सगळं सांगून, दुःख तुमचे वाढवायचे नाही,

कोंडमारा आमचा बाबा, कधीतरी समजून घ्या की. ।।६।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children