STORYMIRROR

Sulabha Gogarkar

Inspirational

3  

Sulabha Gogarkar

Inspirational

नकोस ना रे बाळा

नकोस ना रे बाळा

1 min
202

नकोस ना रे बाळा असा

बाबांना सतत बोलूस,

तुम्हीच म्हटलं, तुम्हीच म्हटलं,

असं सारखं ऐकवुस।।


कष्ट कित्ती केले त्यांनी,

तुलाही ते कळलय ना ?

स्वभाव, काळ, पिढी म्हणून,

दुर्लक्ष तू करीत जा.।।


चुकतात ना ते कदाचित,

तुझ्या दृष्टीने अनेक वेळा,

त्यांनाही वाटत असेल ना,

बाळ माझा "असा" व्हावा. ।।


तुझ्याही आशा आकांक्षा,

फुलण्याची वाट बघणं,

मनी जोपासलेला छंद ,

कृतीतुन साकारणं ।।


चिमुकला हात तुझा त्यांनी,

उभं करण्यासाठी धरला होता,

फक्त चौकटीतलं आयुष्य जगले,

इथच त्यांचं चुकलं कां बाळा ? ।।


काळाबरोबर जगण्याची,

गणितं जरी बदलली असली,

बापापेक्षा बाळ कधीच,

आयुष्यात मोठा नाही ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational