आमचे चंदनकर सर
आमचे चंदनकर सर
अभ्यासता तुम्ही कित्येक रसायने,
त्यामुळेच तर धावतात ती वाहने,
काम आहे तुमचे एखादे पान पाहणे,
आणि तेच आम्हाला विस्तृत पणे सांगणे.
दाखवता तुम्ही आम्हाला दिशा,
त्यामुळेच खऱ्या ठरतात आमच्या आशा,
नसतो कधीही तुमच्या शर्टावर खिशा,
काम करता तेव्हा भीते तुम्हाला ती निशा.
तयार करता तुम्ही रसायन शास्त्रातील पाढे,
त्यामुळे जातच नाही कोणीही तुमच्या पुढे,
आहे तुम्हाला प्रत्येक घटकाचा नाद,
त्यामुळेच तर घालत नाही तुमच्या सोबत कोणीही वाद.
रसायनशास्त्रात आहेत प्रतिक्रिया किती,
अन् त्या तयार करण्याच्या भरपूर पध्दती,
आहे तुम्हाला त्या प्रत्येकाची माहिती,
नाही तुम्हाला त्यामधील एकाचीही भीती.
आनंद घेता तुम्ही आम्हाला शिकवीताना,
हसवता तुम्ही आम्हाला माहिती सांगतांना,
चुकतच नाही तुम्ही कधीही प्रश्न सोडविताना,
शेवटी अभिमान वाटतो ह्या कवीला तुमच्या बद्दल लिहीताना.
