STORYMIRROR

SAURABH AHER

Children Stories Children

3  

SAURABH AHER

Children Stories Children

बालकविता

बालकविता

1 min
496

थांब थांब थांब ,

अगं ये मुंगीताई ..

पटापटा चालते,

थोड बस की बाई ...


इवलासा जीव तू,

किती गोड खातेस ...

डब्यातली साखरं,

कुठे गं तु नेतेस ...

 

सुवास येतो का, 

साखरेचा तुला ...

जेथे गोड असलं 

दिसतेचं तु मला ...


इवलेसे कान तुझे,

इवलेसे तुझे अंग ...

शिस्त फार फार,

चालतात संग संग...


इतकी का तु गप्प ..

थोड तरी बोल ...

साखरेचा खडा देतो

माझ्यासवे चल ...


जा बाई जा तू,

उशीर होईल तुला..

भेटू नंतर आपण,

काम आहेत मला ...


Rate this content
Log in