STORYMIRROR

Suresh Kulkarni

Others Children

3  

Suresh Kulkarni

Others Children

बाळ गणेश

बाळ गणेश

1 min
242

दुडूदुडू धावे बाळ गणेश

दुडूदुडू धावे बाळ 

कौतुके पाहती उमा महेश

दुडूदुडू धावे बाळ 


पायी पैंजणे छुमछुमती

धावे गणू लडिवाळ

हाती कंकणे कीणकीणती

रुळे गळ्यात मौक्तीक माळ


आवाज येता 

मोठे मोठे हलवी

दोन कान

मधेच डोळे बारीक करुन

बघतो गं छान


थुलथुलीत हालते पोट

हवेत उडवी सोंड

रत्नकंदुकामागे धावे

गोंडस वक्रतुंड


भूक लागता धावत येई

मागतो मोदक लाडू

पाणी प्यायला घेई छानसा

सोन्याचा गं गडू


साहित्याला गुण द्या
लॉग इन