मी आणि तू
मी आणि तू
मी जर दूध तू हो साखर
घाल मायेची पाखर
होईल गोड गोड बासुंदी
छान चवदार आपुला संसार !
मी जर तांदूळ तू हो गं मुगाची डाळ
घाल तुपाची धार
होईल खिचडी चवदार
हा आपुला संसार!
मी मोदकाची पारी
तू गूळ खोबरे सारण!
मी कणिक रवा मैदा
तू गूळ साखर पुरण!
मी प्रवेशद्वार या घराचे
तू तोरण देखणं सुरंगी सुगंधी
कलाबूत जरतारीचे
करु या स्वागत सर्वांचे
या छोट्याशा घरी!
तू माझे निरांजन
मी त्यातली फूलवात
देऊ उजेड आपण शांत
या संसाराच्या देव्हाऱ्यात!