शाळा
शाळा
1 min
283
का रे बाळांनो विसरलात का मला
ओढ लागली आहे तुमच्या भेटीला
आतुर झालय आता शाळेचं फाटक पुन्हा
आता विसरुन सारं शाळेला जातोय म्हणा
टणटण वाजणारी घंटा तो प्रतिज्ञेचा आवाज
कुठे तरी हरवलाय शाळेतल्या प्रार्थनेचा साज
मैदानावरील कवायत सुरात चालणारा कदम ताल
घरात बसलेल्या विद्यार्थ्यांचे होत आहेत नुसतेच हाल
वर्गातली बाकं तर मुसूमुसू रडतायत
एकांतात वार्याशी उगाचच लढतायत
मधल्या सुट्टीतला हरवलाय गोधंळ धूडगूस
खोड्या चहाड्यांचा नाही राहिला मागमूस
बाई सर मारलेली हाक त्यांचा असणारा लाडका धाक
फिरवावे लागेल नव्याने शाळेचं हरवलेले चाक
