STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Abstract Inspirational Children

3  

Sanjay Raghunath Sonawane

Abstract Inspirational Children

बैल पोळा

बैल पोळा

1 min
255

सण वर्षाचा आला बैलपोळा

एक दिन आनंद मिळतो बैलाला 

शेतकरी राजांचा, अतिबहुमानाचा

सण आला ग्रामीण भागाचा  


  संवगडी राबणाऱ्या शेतकरी राजांचा

  ज्यांनी दिला बहुमान बैलाला 

  एक दिवस का होईना, राखून ठेवला

  सजवून त्याला गावभर मिरविला  


नित्य नेमाने परत शेतात राबतो

उन, वारा, पाऊस सारा अंगावर झेलतो 

दुःख, यातना बळी राजासाठी पचविले  

कुटुंबासाठी त्याने सारे आयुष्य वेचले  


 निःस्वार्थ सेवा त्याची फक्त जगासाठी 

 त्याचा जन्म फक्त कायम कष्टासाठी

 वर्षभर देह तो मातीत झिजवितो 

  कठीण कष्टाने पीक शेतात उभारतो 


   इमान सोपवितो सारे त्याच्या मालकावरी 

   चाऱ्या पाण्याचे उपकार विश्वासाची चाकरी

   कष्टातून त्याच्या साकारले देवपण 

   सुखी केले त्याने सारे मानवी जन


शेवटही त्याचा मातीतच होतो 

परमार्थ मुक्या प्राण्यातून दिसतो

निःस्वार्थ सेवा, प्रेम, माया त्यांनी शिकविली

संतांची शिकवण प्राण्यांनीसुद्धा जपली


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract