STORYMIRROR

काव्य चकोर

Abstract

4  

काव्य चकोर

Abstract

मला पतंग व्हायचं आहे

मला पतंग व्हायचं आहे

1 min
1.1K

(तिच्यातील ती)

मला पतंग व्हायचं आहे...


तू म्हणालीस,

तुला पतंग व्हायचं आहे

मनाच्या आकाशात मुक्त विहरायचं आहे...

पण तुझा पतंग तर त्यांनी केव्हाच केलाय

आणि दोरही त्यांच्याच हातात आहे...!!


तुला ते उंच उडवतील

पण वाऱ्याच्या हवाली करतील

त्यांच्या इशाऱ्यावरच तुला वळावे लागेल...

तुझ्यातीलच कोणीतरी कापेल तुझा मांजा

अन् उडण्याच्या तुझ्या स्वप्नांना

क्षणात सुरुंग लागेल...

कंन्नीच्या बेडीचा अर्थ तेव्हा तुला कळेल...!!


म्हणूनच

तू पतंग होऊ नको

कोणाच्या हातातील बाहुली बनू नको...

तुला बनायचंच असेल काही

तर तू स्वतः स्वयंसिद्ध हो

लोक खो घालतील पण तू लक्ष देऊ नको

जरा स्पष्टच बोलतोय तू रागावू नको...!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract