STORYMIRROR

प्रियंका ढोमणे

Abstract

4  

प्रियंका ढोमणे

Abstract

प्रेम कुणावर असावे

प्रेम कुणावर असावे

1 min
500

प्रेम कुणावर असावे,

स्वतःची चिंता न करता

सीमेवर उभ्या असलेल्या सैनिकांवर 

की आयुष्यात दोन शब्द 

गोड बोलुन जाणाऱ्या त्या व्यक्तींवर।।१।।


प्रेम कुणावर असावे,

हे जग दाखवणाऱ्या आई-वडिलांवर 

की आपल्या भावनांशी खेळून

हृदय तोडून गेलेल्या त्या व्यक्तींवर।।२।।


प्रेम कुणावर करावे,

रात्रंदिवस कष्ट करून, वेळेची चिंता न करून

आपल्यासाठी राबणाऱ्या शेतकरी बापावर

की पिझ्झा-बर्गर खाऊ घालणाऱ्या 

त्या व्यक्तींवर।।३।।


प्रेम कुणावर करावे,

स्वतःच्या अंगाचा घाम गाळून दोन चाकी गाडीवर आपल्याला फिरवणाऱ्या त्या बापावर

की बापाच्या पैशांवर माज करून  

घेतलेल्या त्या चारचाकी गाडीत फिरवणाऱ्या त्या व्यक्तींवर।।४।।


प्रेम कुणावर असावे,

बापापासून लपून 

आपल्या चुका प्रेमाने समजून सांगणाऱ्या

त्या आईवर,

की चारचौघात शिव्या देऊन

आपली इज्जत काढणाऱ्या 

त्या व्यक्तींवर।।५।।


तुम्हीच सांगा आता

प्रेम कुणावर असावे

दोन दिवसांचं प्रेम देणाऱ्या त्या व्यक्तींवर

की या देशातील, आयुष्यातील

प्रत्येक खुशी देणाऱ्या 

त्या आपल्या देवमाणसांवर।।६।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract