STORYMIRROR

प्रियंका ढोमणे

Romance

4  

प्रियंका ढोमणे

Romance

मिठीत तुझ्या घेशील का...?

मिठीत तुझ्या घेशील का...?

1 min
1.8K

मनातील यातना माझ्या

तू ही थोड्या अनुभवशील का..?

घाव माझे विसरायला

मिठीत तुझ्या घेशील का...?


डोळ्यांतील अश्रू माझे

तुझ्या हातांनी पुसशील का...?

भेटुनी मजला तू

मिठीत तुझ्या घेशील का...?


मोकळ्या केसांतुनी माझ्या

हात तुझा फिरवशील का...?

थंडगार आसमंतात

मिठीत तुझ्या घेशील का...?


हृदयातील साद माझी

कानी तुझ्या पोहचेल का...?

उबदार कुशीत तुझ्या

मला एकदा विसावशील का...?


प्रेमाच्या या दुनियेत

साथ माझी देशील का...?

चांदण्यांसमवेत मला

मिठीत तुझ्या घेशील का...?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance