Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

प्रियंका ढोमणे

Romance

3  

प्रियंका ढोमणे

Romance

साथ मला देशील ना

साथ मला देशील ना

1 min
1.6K


खोट्यात मी पडल्यावर

विश्वास माझ्यावर करशील ना...

सुख-दुःखाच्या प्रत्येक क्षणी

हात हाती घेशील ना...

आयुष्यभराची साथ सख्या मला तू देशील ना..||1||

 

चुकले मी कुठेही जरी

मला तू समजावशील ना...

हरवून मी जाताच कुठे

मला तू शोधशील ना...

आयुष्यभराची साथ सख्या मला तू देशील ना..||2||


हृदयाची हाक माझी

हळूच तू ऐकशील ना...

या वेड्या परीच्या मनाला

तू तरी समजून घेशील ना...

आयुष्यभराची साथ सख्या मला तू देशील ना..||3||


तुझी राणी बनून जगात या

मला तू फिरवशील ना...

तुझ्या नावाचं कुंकू

माझ्या माथ्यावर लावशील ना...

आयुष्यभराची साथ सख्या मला तू देशील ना..||4||


कितीही भांडण झाले जरी

मिठीत मला तू घेशील ना...

शब्द कमी पडले माझे

तरी भावनेतून मला समजून घेशील ना..

आयुष्यभराची साथ सख्या मला तू देशील ना..||5||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance