STORYMIRROR

प्रियंका ढोमणे

Tragedy Others

3  

प्रियंका ढोमणे

Tragedy Others

आयुष्याच गणित

आयुष्याच गणित

1 min
460

नव्हते होणार स्वप्न साकार,

तरीही का मी प्रेम केले

नाही आपलं भविष्य काही,

तरी तुझ्यात मी का अडकुन गेले..

 

आयुष्याच्या या गणितात का मी फसुन गेले,

माझ्याचं आयुष्यासोबत का मी खेळुन गेले||1||


माझ्या या दुनियेत मी,

तुला का सामावुन घेतले

उधारीच्या तुझ्या प्रेमावर,

मी का भावुक झाले...


आयुष्याच्या या गणितात का मी फसुन गेले,

माझ्याचं आयुष्यासोबत का मी खेळुन गेले||2||


प्रेमाच्या या सागरात

मी स्वतःलाच हरवुन बसले,

मायबापासाठी शेवटी एक

मी कर्तव्य बनुन गेले...


आयुष्याच्या या गणितात का मी फसुन गेले,

माझ्याचं आयुष्यासोबत का मी खेळुन गेले||3||


आयुष्याचं पाऊल माझे,

कदाचित चुकीच पडले

पाखरांसारखे उडण्याऐवजी,

बंद घरट्यात अडकुन पडले...


आयुष्याच्या या गणितात का मी फसुन गेले,

माझ्याचं आयुष्यासोबत का मी खेळुन गेले||4||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy