STORYMIRROR

प्रियंका ढोमणे

Romance

4  

प्रियंका ढोमणे

Romance

प्रेमाचं स्वप्न

प्रेमाचं स्वप्न

1 min
517

मेहंदी तुझ्या नावाची,

आज माझ्या हातावर लागणार

बारीक नक्षीने नाव

त्यात तुझं मी लपवणार...


साता जन्माची गाठ,

आज आपण बांधणार

आपल्या प्रेमाला नव्याने

आज सुरूवात करणार...


तुझ्या नावाचा कुंकू,

माझ्या भांगेत भरणार

तुझी पाठ राखिण बनून,

घरी मला तू नेणार...


मंगळसुत्राचा धागा,

माझ्या गळ्यात टाकणार

तुझ्या-माझ्या नात्याची,

आज ओळख बनणार...


थोरामोठ्यांचा आशीर्वाद

आज माथी आपल्या पडणार

जोडी तुझी नि माझी,

आज मांडवी सजणार...


आपल्या प्रेमाचं स्वप्न

आज साकार होणार...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance