सावली तुझी
सावली तुझी
तुझ्याच सावलीत जगते
तुझ्यातच मला बघते मी,
दुःख सारे विसरूनी
तुलाच देवाकडे मागतेय मी...
सावली तुझी असली तरी
जीव माझा त्यात आहे,
तुझ्याविना जीवन माझे
कदापि अधुरेच आहे..
अंधारालाही उजळून टाकते
अशी तुझी सावली आहे,
चांगल्यालाही वेड लावते
असं तुझं हास्य आहे..
तू नाही सोबतीस तरी
तुझी सावली कायम असू दे,
तुझ्या सावलीतही मला
तुझं रूप असंच दिसू दे...