मोगरा
मोगरा
1 min
460
काळ्याभोर माझ्या वेणीवरील गजरा
आठवणीत माझ्या त्याला हरवुन टाकायचा...
इतका सुंदर हा मोगरा
प्रेमाचं वेड सगळ्यांना लावुन जायचा...
बघताचं मला तो माझ्या प्रेमात पडुन जायचा...
पाहताचं केसांमधी गजरा माझ्या
सावळ्या मुखड्यावर त्याच्या हास्य देऊन जायचा...
मोगरयाच्या फुलांचा माळलेला हा गजरा
प्रेमाचा सुगंध पसरवुन जायचा...
बघताच मला तो माझ्या प्रेमात पडुन जायचा..
