STORYMIRROR

Kalpana Nimbokar

Abstract

4  

Kalpana Nimbokar

Abstract

मी कधीच केले नाही

मी कधीच केले नाही

1 min
327

मी कधीच शब्दांना

बंदिस्त केले नाही

मी कधीच लेखणीला

आश्वस्त केले नाही!!!


जिणे जगणे माझे

सारे पराभवाचे

कडकी दुष्काळाची कधी

मी तक्रार केली नाही!!!


संस्कृतीही जळाली

आता आदमखोराच्या वणव्यात

परंपरेला मी कधी

लाचार केले नाही!!!


उघडलीत मी पाने

नकळत भूतकाळाची

तुझ्या आठवणींना मी

कधी दूर केले नाही!!!


हरवले माझ्यात मी

वाट चालता ध्येयाची

ध्येयवेडी मी अशी

मन कधी विश्रांत केले नाही!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract