वैताग...
वैताग...
वैताग, वैताग, नुसता वैताग
घरी-दारी सगळीकडे तोच तो
माणसाने जगावे तरी कसे
परत कसा येतो तोच तो...
समस्या आली की वैताग वाढतो
वैतागलेला माणूस कुठेतरी राग काढतो
याचा कधी अंदाज येतच नसतो
तो कधी कमी न होता आणखी चढतो...
पैसे नाही आला वैताग
पगार कमी वाढली परेशानी
डोकेच चालत नाही
कसा करावा खर्च-पाणी...
हप्ते थकले आला वैताग
दुसर्याच दिवशी बँकवाले दारात
आता नाही देतो नंतर म्हणताच
बोलायला लागतात जोरात...
निघाला ड्युटी, पंक्चर गाडी आला वैताग
ढकलत नेतो लागलीच गॅरेजला
थांबा थोड गर्दी आहे
राखावे लागते त्याच्या मर्जीला...
नेट संपले आला वैताग
रोजची सवय खंडित झाली
मन:शांती उडाली
मेंदूची कार्य प्रणाली पडीत झाली...
बॉसचा फोन आला वैताग
काम तरी किती करावे
किती त्रास होतो
हे यांना कोणी आणि कसे सांगावे...
बॅंकेत रांग आला वैताग
आजकाल लोक कामच करत नाही
त्यांच्या कामाची पावती
त्यांना दिल्याशिवाय रांगच सरकत नाही...
कोणी बोलले आला वैताग
आपले काही चुकले याचे भान नाही
तो कसा काय बोलला
मला बोलण्याचे त्याचे काही काम नाही...
रोज तेच ते आला वैताग
नवीन जीवनात काहीच नाही
असेच जगून मरुन जायचे
याच्यात कधी बदलच नाही...
असे आणि अनेक कारणे आहेत
ज्यामुळे वैताग जन्मास येतो
बरे चालले असते आपले
त्यात खोडा घालून देतो...
वैताग तर हा येणारच
त्याला कोणी रोखू शकत नाही
तो जगण्याचा भाग आहे
त्याला वैतागून घालू शकत नाही...
